बाळूमामा भक्तांना नाममात्र दराने पुन्हा धान्यविक्री करण्याची मागणी

कोल्हापूर-भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथील बाळूमामा देवस्थानला काही भाविकांकडून दान रूपाने धान्य दिले जाते. हे धान्य पुन्हा गरजू भक्तांना नाममात्र दराने विकले जाते. मात्र ही धान्यविक्री कर्मचाऱ्यांच्या दादागिरीमुळे बंद ठेवली आहे. हे धान्य वाटप येत्या २६ जानेवारीपर्यंत पुन्हा सुरू करावे, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडले जाईल, असा इशारा भुदरगड तालुका मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी दिला आहे.

भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथील बाळूमामा देवस्थान हे महाराष्ट्र, कर्नाटक, कोकण या राज्यातील भक्तांचे श्रध्दास्थान आहे.या देवस्थानला अनेक भाविकांकडून धान्यरूपात दान दिले जाते. हे धान्य भक्तांना पुन्हा नाममात्र दरात दिले जात होते. मात्र काही कर्मचारी हेच धान्य जादा दराने विकत होते. त्यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष अशोक पाटील यांनी आवाज उठविला होता. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांवर देवस्थानने कारवाई केली. पण नाममात्र दरातील धान्यवाटप अद्याप बंद ठेवले आहे. त्यामुळे अशोक पाटील यांनी हे धान्यवाटप पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top