बिग एफएम घेण्यासाठी रेडिओ मिर्ची,ऑरेंज शर्यतीत

नवी दिल्ली- आघाडीचे बिग एफएम रेडिओ नेटवर्क विकत घेण्यासाठी रेडिओ मिर्ची आणि आणि रेडिओ ऑरेंजने २५१ कोटी रुपयांची बोली लावली आहे. एफएम रेडिओ नेटवर्क सूत्रांनी सांगितले की दिवाळखोरी प्रक्रियेतून जात असलेल्या बिग एफएमला घेण्याच्या शर्यतीत हरयाणातील सॅफायर एफएमनेहीबोली लावली आहे. योगायोगाने सॅफायर एफएमनेही २५१ कोटी रुपयांचीच बोली लावली आहे.

रेडिओ मिर्ची आणि ऑरेंज एफएम कंसोर्टियम आणि सॅफायर एफएम या दोन्ही बोलीदारांनी ३० दिवसांच्या आत बोलीची रक्कम भरण्याची ऑफर दिली आहे. बिग एफएम दोन्ही बोलीदारांच्या ऑफरवर विचार करण्याच्या तयारीत आहे. बोलीदारांना ६० कोटी रुपये कंपनीच्या खात्यात भरावे लागणार आहेत.वास्तविक बिग एफएमवर एकूण ५७८ कोटी रुपयांचे कर्ज आहे.ही रक्कम एकूण जाहिरात दाव्यांच्या तुलनेत ५५ ते ६० टक्के इतकी जास्त असू शकते. बिग एफएमच्या मालकीचे रिलायन्स ब्रॉडकास्ट नेटवर्क लिमिटेड हे देशातील सर्वांत मोठे रेडिओ नेटवर्क आहे. या नेटवर्कची तब्बल ५० स्टेशन्स असून ती १२०० शहरे आणि ५० हजार गावांमध्ये कार्यरत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top