बुधवारपासून सालेली- सातेरीत केळबाई देवतांची प्रतिष्ठापना

पणजी – उत्तर गोवा जिल्ह्यातील सत्तरी तालुक्यातील सालेली सत्तरी येथील श्री सातेरी केळबाई, म्हाळसाई, ब्राह्मणी, जोगेश्वरी, पंजन्मय,घडवंश, कुणबीवंश व सहकुटुंब देवता प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा बुधवार १ मे पासून सुरू होणार असून तो ३ मे पर्यंत चालणार आहे.

या तीन दिवसांत देवस्थान समितीने विविध, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.यामध्ये दररोज देवता पूजन, प्राणप्रतिष्ठापना, पूर्णाहुती, आरती आणि इतर धार्मिक विधी होणार आहेत. १ मे रोजी मान्यवरांच्या हस्ते नवीन मंचाचे उद्‌घाटन व सन्मान सोहळा आणि रात्री ८ वाजता कीर्तनाचा कार्यक्रम होईल.दुसर्‍या दिवशी गोमंतकातील नामवंत कलाकारांचे भजन आणि समारोपाच्यादिवशी देवता पूजन,देवदेवतांची प्रतिष्ठापना,महापूजा, पूर्णाहुती,अभिषेक, महाआरती,महाप्रसाद, आशिर्वाद, समराधना, मान्यवरांच्या हस्ते सत्कार सोहळा आणि गोमंतकातील कलाकारांचा संगीत रजनी कार्यक्रम होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top