बुलढाण्याच्या कोलदमध्ये माजी सरपंचाची हत्या

बुलढाणा- बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील कोलद गावच्या माजी सरपंचाची हत्या झाली. गजानन मोतीराम देऊळकर (६०) असे माजी सरपंचाचे नाव आहे. काल संध्याकाळी गजानन यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडल्याचे आढळले. ग्रामस्थांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. माजी सरपंचाच्या हत्येमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
माजी सरपंच असलेल्या गजानन यांचे त्याच रस्त्यावर शेत आहे. ते दररोज शेतात येजा करायचे. काल सुध्दा ते त्यांच्या शेतात गेले होते. मात्र त्याचवेळी काल कोलदमध्ये अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यावरील रहदारी देखील कमी झाला होती. याचाच फायदा घेऊन गजानन यांची हत्या केली असल्याचा अंदाज ग्रामस्थांनी वर्तवला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरु आहे. गजानन यांच्या हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top