बुलेट ट्रेन ऑगस्ट २०२६पर्यंत धावणार रेल्वेमंत्र्यांनी कामाचा व्हिडिओ दाखवला

नवी दिल्ली :

मुंबई अहमदाबाद दरम्यान भारतातील पहिला बुलेट प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. या प्रकल्पात गुजरातमधील बिलीमोरा आणि सुरत दरम्यान ५० किलोमीटर लांबीचा ट्रॅक बनवला जात आहे. त्याचे काम ऑगस्ट २०२६पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. या प्रकल्पाच्या कामाची झलक दाखवण्यासाठी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अश्विनी वैष्णव म्हणाले की, २१ नोव्हेंबरपर्यंत बुलेट ट्रेन प्रकल्पच्या २५१.४० किलोमीटरपर्यंतचे पिलर बसवण्याचे काम झाले आहे. १०३.२४ किलोमीटरचे सुपर स्ट्रक्चरदेखील तयार आहे. वलसाड, नवसारी, सूरत, बडोदरा, आनंद जिल्ह्यातील पुलांची कामे पूर्ण झाली आहेत. मुंबई अहमदाबाद बुलेट प्रकल्पांतर्गत गुजरातमध्ये वलसाड जिल्ह्यात पार, औरंगा, नवसारीत पूर्णा, मिंधोला, अंबिका आणि वेंगानिया नदीवर पूल बनवण्यात आले आहेत. कवच यंत्रणेचे काम २०१६ पासून सुरू झाले होते. सध्या कवच नेटवर्क निर्मितीचे काम १५०० किलोमीटर प्रतिवर्ष असे आहे.

याशिवाय रेल्वे मंत्र्यांनी नॅशनल हाय स्पीट रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून बांधण्यात आलेल्या पुलांच्या कामाचा ड्रोन व्हिडिओ शेअर केला आहे. मुंबईत बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये बुलेट ट्रेनच्या स्थानकाचे काम सुरु आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाची एकूण लांबी ५०८ किलोमीटर असून मुंबई आणि अहमदाबाद ही दोन शहरे जोडली जाणार आहेत. बुलेट ट्रेनचा कमाल ताशी वेग ३२० किलोमीटर असेल. या वेगाने हे अंतर २ तास ७ मिनिटांमध्ये पूर्ण होईल. महाराष्ट्रात याची बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई अशी ४ स्थानके असतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top