बेंजामिन नेतन्याहूंच्या विरोधात इस्रायलमध्ये जोरदार निदर्शने

तेल अविव- हमासने ओलीस ठेवलेल्या अनेक इस्रायली ओलीसांचे व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर शनिवारी रात्री हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून संपूर्ण इस्रायलमध्ये नेतन्याहू सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली.

या आंदोलनात जेरूसलेममधील आंदोलक आणि ओलीस कुटुंबे सहभागी झाली होते. त्यांनी शहराच्या मध्यभागी भव्य असा मोर्चा काढला. यावेळी बेन येहुदा स्ट्रीटवर नेतन्याहू सरकार विरोधात अनेकांनी भाषणे केली. यावेळी तेल अविव येथील अझरेली मॉलजवळही तीन ठिकाणी स्वतंत्र आंदोलने केली. तसेच महामार्ग रोखण्याचा आणि जाळपोळ करण्याचा प्रयत्नही करण्यात आला.यावेळी आंदोलकांच्या हातात सरकार विरोधीफलक आणि झेंडे होते.

दरम्यान, हमासने जारी केलेल्या एका व्हिडिओमध्ये मिरान आणि सहकारी कैदी किथ सिगेल यांनी स्वतःची ओळख करून देत लवकरच आम्हा सर्वांची सुटका होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top