बेरोजगार तरुणाच्या प्रश्नाला उत्तर देण्यास पाटलांचा नकार

पुणे – पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक महोत्सवाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी कुणाल नावाच्या एका तरुणाने वनविभागाशी संबंधित परीक्षेविषयी पाटलांना प्रश्न विचारला होता. अनेकदा परीक्षा देऊनही या तरुणाला नोकरी मिळू शकलेली नाही. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी तरुणाच्या प्रश्नाला उत्तर देणे स्पष्टपणे नाकारले. ते म्हणाले की, तुम्ही पत्रकार आहात का,पत्रकार नसाल तर बाजूला व्हा’. चंद्रकांत पाटील यांनी या तरुणाला बाजूला घेण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या. त्यानंतर पोलिसांनी या तरुणाची चौकशी केली आणि नंतर त्याला सोडून दिले. यापूर्वीच्या कटू अनुभवांमुळे पाटील हे अलिकडे सार्वजनिक ठिकाणी अनोळखी व्यक्तींपासून सावधगिरी बाळगत असल्याचे या घटनेतून दिसून आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top