बेळगाव थंडीने गारठले पारा १५ अंशावर

बेळगाव

बेळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढत आहे. सर्वाधिक २९ अंश (सेल्सिअस) इतके तापमान असणाऱ्या बेळगावचा पारा काल १५. ४ अंशावर आला. काही दिवसांपूर्वी वातावरणात अचानक बदल होऊन पावसाने हजेरी लावली होती. आता डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून थंडीने जोर धरला आहे. ढगाळ वातावरणामुळे हवेतील गारवा वाढण्याबरोबरच रात्री आणि पहाटेच्या वेळी अधिक थंडी जाणवू लागली आहे.

प्रामुख्याने ग्रामीण भागात थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे. थंडीमुळे उपनगरांसह ग्रामीण भागात शेकोट्या पेटू लागल्या आहेत. हवामानात वारंवार होणारा बदल आणि वाढणारी थंडी यामुळे सर्दी, खोकला, ताप यासारख्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. ऑक्टोबरचे उष्ण तापमान ओसरल्यानंतर एकदम थंडीला सुरुवात झाल्यामुळे आजारपण येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top