बॉक्सर मेरी कोम म्हणते, अजून निवृत्ती नाहीच!

सहा वेळा जग्गजेतेपद पटकावणारी आणि २०१२ मध्ये भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून देणारी बॉक्सर मेरी कोम निवृत्त होत असल्याची बातमी काल सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र, मेरी कोमने एक्सवर पोस्ट करून माझ्या आपण निवृत्तीची घोषणा केलेलीच नाही, असा खुलासा केला आहे. त्यामुळे तिच्या निवृत्तीची घोषणा आजही वेगळ्या कारणामुळे चर्चेत राहिली.
आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघाच्या नियमानुसार वयाची चाळिशी ओलांडलेल्या बॉक्सर्सना बॉक्सिंगच्या स्पर्धेत भाग घेण्यास संमती नाही. मात्र आता मेरी कोमचे म्हणणे वेगळे आहे. तिने म्हटले आहे की, मी बॉक्सिंगमधून निवृत्त होत असल्याची कुठलीही घोषणा केलेली नाही. काही मीडिया रिपोर्टनुसार मी निवृत्तीची घोषणा केली आहे असे सांगितलं जात आहे. मात्र ते योग्य नाही. मी २४ जानेवारी रोजी डिब्रूगढ येथील एका शाळेत गेले होते. तिथे मी असे म्हटले होते की मला अजूनही खेळण्याची इच्छा आहे. मात्र माझे सध्याचे वय पाहता ऑलिम्पिकमध्ये मला सहभागी होता येणार नाही. मात्र, मी माझा खेळ चालू ठेवेन. मी माझ्या फिटनेसवरही भर देते आहे. मी जे म्हटले होते, त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. मला जेव्हा निवृत्ती जाहीर करायची असेल, तेव्हा मी निवृत्ती सगळ्यांसमोर जाहीर करेन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top