बोईंग विमानांच्या गुणवत्ता चौकशीतील निष्काळजीपणाची चौकशी नव्याने सुरू

वॉशिंग्टन
बोईंग विमानांमध्ये अनेक दोष आढळल्यानंतर कंपनीने या दोषाची चौकशी केली होती. परंतु बोईंग कर्मचार्‍यांनी ही चौकशी नीट केली की नाही, याची आता अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (एएएफ) नव्याने चौकशी करणार आहे. बोईंग ७८७ जेट विमानांचे कर्मचाऱ्यांकडून तपासणी रेकॉर्ड मध्ये फेरफार झाले आहे का, याचीही चौकशी करण्यात येत आहे.
एफएए बोईंगच्या आतापर्यंत ग्राहकांना सुपूर्द न केलेल्या ड्रिमलायनर विमानांचेही परीक्षण करणार आहे त्याचबरोबर सध्या सेवेत असलेल्या विमानांचेही परीक्षण करण्याची योजना तयार करण्यात आली आहे.
एफएएने आपल्या एप्रिल महिन्याच्या एका अहवालात म्हटले होते की बोईंगच्या ७८७ ड्रिमलायनर विमानांचे पंख जोडताना आवश्यक परीक्षण केले गेले नव्हते. बोईंगच्या एका माजी कर्मचाऱ्यानेही विमानांचे कंपनीत नीट चाचण्या होत नसल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. आतापर्यंत या प्रकरणी आवाज उठवणाऱ्या दोघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने बोईंग विमानाच्या चाचण्याभोवतीचे संशयाचे ढग अधिकच गडद झाले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top