Home / News / ‘बोरा बाजार’ चे नामकरण‘शांतीनाथ देरासर मार्ग’ करा

‘बोरा बाजार’ चे नामकरण‘शांतीनाथ देरासर मार्ग’ करा

मुंबई – दक्षिण मुंबईतील फोर्ट येथील बोरा बाजार मार्गाचे नामकरण ‘शांतीनाथ देरासर मार्ग’ असे करण्यात यावे,अशी शिफारस विधानसभा अध्यक्ष आणि...

By: E-Paper Navakal

मुंबई – दक्षिण मुंबईतील फोर्ट येथील बोरा बाजार मार्गाचे नामकरण ‘शांतीनाथ देरासर मार्ग’ असे करण्यात यावे,अशी शिफारस विधानसभा अध्यक्ष आणि कुलाबा विधानसभा क्षेत्राचे आमदार ॲड.राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे एका पत्राद्वारे केली आहे.

आमदार राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की,कुलाबा विधानसभा क्षेत्रातील बोरा बाजार,फोर्ट येथे प्राचीन असे श्री शांतीनाथ श्वेतांबर जैन देरासर मंदिर आहे. श्वेतांबर जैन भाविकांच्या दृष्टीने हे अत्यंत पवित्र असे धार्मिक स्थळ असून येथे वर्षभर श्रद्धाळू आणि भाविक मोठ्या संख्येने भेट देत असतात.फोर्ट विभागातील रहिवाशांची या विभागातील रस्त्याचे नामकरण ‘शांतीनाथ देरासर मार्ग’ असे करण्यात यावे, अशी गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे.जैन बांधवांची ही मागणी लक्षात घेता तातडीने याबाबतचा निर्णय घेण्यात यावा.”

Web Title:
संबंधित बातम्या