बोरिवली स्थानकात बिघाड लोकल वाहतूक विस्कळीत

मुंबई
पश्चिम रेल्वेवरील बोरिवली स्थानकात आज सकाळी तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा 15 ते 20 मिनिटे विलंबाने धावली. त्यामुळे चर्चगेटकडे येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
बोरिवली रेल्वे स्थानकातील पॉईंटमध्ये बिघाड झाल्याने काही वेळासाठी लोकल सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवासी गोंधळून गेले. बिघाडाची माहिती मिळताच पश्चिम रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पॉईंट बिघाड दुरुस्त केला. मात्र, या बिघाडामुळे लोकल सेवा खोळंबली. यामुळे वातानुकूलित लोकल आणि सामान्य लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. तर, दुपारपर्यंत लोकल सेवा विलंबाने धावत होती. दरम्यान, बोरिवली येथील पॉईंट बिघाड त्वरित दुरुस्त करून लोकल सेवा पूर्ववत केली, असे पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top