Home / News / ब्राझीलमधील विमान अपघात सर्व ६१ प्रवाशांचा मृत्यू

ब्राझीलमधील विमान अपघात सर्व ६१ प्रवाशांचा मृत्यू

रिओ – ब्राझील येथील साओ पाउलो येथे काल एका विमानाचा अपघात झाला. या अपघातात विमानामधील सर्व ६१ जणांचा मृत्यू झाला....

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

रिओ – ब्राझील येथील साओ पाउलो येथे काल एका विमानाचा अपघात झाला. या अपघातात विमानामधील सर्व ६१ जणांचा मृत्यू झाला. यात चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ब्राझीलचे राष्ट्रपती लुईस इनासिओ लुला दा सिल्वा यांनी मृतांच्या कुटुंबीयांबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
दुहेरी इंजिन असलेले टर्बोप्रॉप विमान ब्राझीलच्या दक्षिणेकडील शहर पराना येथील कॅस्केवेल येथून काल सकाळी ११.३० वाजता साओ पाउलो शहरातील ग्वारुलहोस विमानतळाकडे निघाले. विन्हेडो शहराजवळ हे विमान कोसळले . उड्डाण केल्यानंतर दीड तासाने त्याच्याकडून शेवटचा संदेश मिळाला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विमान फिरकी घेत जमिनीवर पडल्याचे दिसून आले. विमान कोसळले त्या भागातील एका घराचे नुकसान झाले असून घरातील कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title:
संबंधित बातम्या