ब्रिटनच्या टाटा स्टीलमधील ३,००० कर्मचा-यांच्या नोक-या जाणार

लंडन – टाटा स्टील कंपनीने त्यांचा ब्रिटनमधील आपला व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे कंपनीतील ३ हजार कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे. टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांची लंडनमधील ताज हॉटेलमध्ये कामगार संघटनांसोबत बैठक पार पडली होती. या बैठकीत अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला.

ब्रिटनमधील टाटा स्टीलच्या व्यवसायामुळे कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. पोर्ट टॅलबोट प्लांटमुळे कंपनीला दुस-या तिमाहीत ६५११ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. टाटा स्टील कंपनीने अलीकडेच ब्रिटिश सरकारसोबत करार केला. या करारानुसार ब्लास्ट फर्नेसेस (लोखंड निर्मिती) हे इलेक्ट्रिक फर्नेससमध्ये बदलण्यात येईल. यामुळे खर्च कमी होईल तसेच प्रदूषण कमी होण्यासाठीदेखील मदत होणार आहे. वेल्समधील पोर्ट टॅलबोट प्रकल्पात एकूण १२५ कोटी पौंडांची गुंतवणूक केली जाईल. यापैकी ५० कोटी पौंड म्हणजेच ६१ कोटी डॉलर टाटा स्टील कंपनीला अनुदान स्वरूपात मिळणार आहेत. पोर्ट टॅलबोट स्टीलवर्क्स हे ब्रिटनमधील सर्वात मोठे स्टील उत्पादन युनिट आहे. ब्रिटिश सरकार कंपनीचे कामकाज चालू ठेवण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यापासून वाचवण्यासाठी कंपनीला आर्थिक सहाय्य पुरवत होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top