ब्रिटनमधील शरणार्थींना रवांडात सोडण्याच्या कारवाईला सुरुवात

लंडन -ब्रिटनमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्या शरणार्थ्यांना आफ्रिकेतील रवांडा देशामध्ये सोडण्याच्या कारवाईला सुरुवात करत असल्याची घोषणा ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी केली आहे.तसेच अनधिकृत शरणार्थ्यांना रवांडाला घेऊन जाणारे पहिले विमान १० ते १२ आठवड्यांत रवाना होईल.मात्र या कार्यवाहीचे संवेदनशील तपशील उघड केला जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या शरणार्थ्यांना रवांडाला घेऊन जाण्यासाठी मालवाहू विमान ठरवण्यात आले आहे.या शरणार्थ्यांना कोठे उतरवायचे याचे ठिकाण निश्‍चित केले गेले असून अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणदेखील पूर्ण झाले आहे. यासंदर्भातील विधेयकावर काल सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे सुनक यांनी सांगितले. मात्र, या निर्णयाला संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील सदस्यांनी विरोध केला आहे. तरीही सुनक आपल्या योजनेवर ठाम आहेत. ब्रिटनमध्ये घुसलेल्या सर्व शरणार्थींना बाहेर काढले जाईल. त्यासाठीच ही योजना आपण राबवणार असल्याचे त्यांनी पुन्हा ठामपणे म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top