ब्रिटनमध्ये धुम्रपान बंदी विधेयक संसदेत मंजूर

लंडन – ब्रिटनचे पंतप्रधान ऋषि सुनक यांच्या महत्त्वाकांक्षी धुम्रपान बंदी विधेयकाला ब्रिटनच्या संसदेने मंजुरी दिली. मात्र सुनक यांच्याच मजूर पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात घोषणा देत विधेयकाला विरोध केला. हे विधेयक संमत झाले तर ब्रिटनच्या इतिहासातील धुम्रपानाच्या व्यसनाविरोधात उचलण्यात आलेले ते सर्वात मोठे पाऊल ठरेल. टप्प्याटप्प्याने भावी पिढी पूर्णपणे धुम्रपानमुक्त करण्याचे मोठे उद्दिष्ट या विधेयकामध्ये ठेवण्यात आली आहे. यानुसार १ जानेवारी २००९ नंतर जन्मलेल्या मुला-मुलींना २०२७ सालापर्यंत सिगारेट आणि ई-सिगारेट विकण्यावर या कायद्याने बंदी घालण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर दरवर्षी २०२७ ची ही मर्यादा एक एक वर्षाने वाढवत नेऊन अंतिमतः धुम्रपानावर कायमची बंदी लागू करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top