ब्रिटिश एअरवेज वर्णद्वेशी आणि पक्षपाती! सनदी अधिकारी अश्विनी भिडेंचा आरोप

मुंबई – ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी ‘ब्रिटिश एअरवेज’ कंपनीवर पक्षपाती आणि वर्णभेदी वागणूक दिल्याचा आरोप केला आहे. भिडे यांनी ब्रिटिश एअरवेजचे प्रीमियन इकॉनॉमी क्लासचे तिकिट बुक केले होते. परंतु त्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल टर्मिनलवरील चेक -इन काऊंटरवर गेल्या तेव्हा बुकिंग जास्त झाल्याने त्यांचे तिकीट डाऊनग्रेडेड (खालच्या श्रेणीत) केल्याचे सांगण्यात आले.
अश्विनी भिडे यांनी एक्सवर पोस्ट करून आपला संताप व्यक्त करत असे म्हटले आहे की, तुम्ही फसवणूक करत आहात की, तुमचे वर्णद्वेशी धोरण राबवत आहात. अतिरिक्त बुकिंगच्या नावाखाली चेक-इन काऊंटरवर प्रीमीयम इकॉनॉमी क्लासच्या प्रवाशाला कसे डाऊनग्रेड करू शकता. याची नुकसानभरपाई तर सोडा तिकीट भाड्यातील फरकही दिला जात नाही. हे सतत होत असून त्याची प्रथाच पडली आहे. भिडे यांनी सांगितले की, काही महिन्यांपूर्वी त्याच्या मुलाला मल्हारही तसाच अनुभव आला. मल्हार याने ब्रिटिश एअरवेजचे लंडनहून शिकागोला जाण्याचे प्रीमियम इकॉनॉमीचे तिकीट काढले होते. त्यालाही चेक-इन काऊंटरवर जास्त बुकिंग झाल्याचे कारण देऊन सीट नाकारण्यात आली. त्याच्या तिकिटदरातील फरक ३०० ते ४०० पौंडाचा होता. त्याला कुठलेही कारण न देता ७५ पौंडाची भरपाई देण्यात आली. भिडे यांनी ही पोस्ट केल्यावर इतर अनेकांनीही आपल्याला असा अनुभव आल्याचे प्रत्युत्तरादाखल सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top