ब्रुनेइचे प्रिन्स अब्दुल यांची सर्वसामान्य मुलीशी लग्नगाठ

बंडर सरी बेगवन –
ब्रुनेईचे सुल्तान हसनल बोलकियाह यांचा 32 वर्षीय मुलगा प्रिन्स अब्दुल मतीन 29 वर्षीय यांग मुलिया अनीशा रोस्ना हिच्यासोबत विवाहबद्ध झाले. यांग मुलिया अनीशा रोस्ना सर्वसामान्य घरातील आहे. त्यामुळे प्रिन्स अब्दुल मतीन यांचे जगभरातून कौतुक होत आहेत.
या विवाहाचा भव्य सोहळा ब्रुनेईमध्ये 10 दिवस चालणार आहे. इस्लामिक पद्धतीने होणार्या या लग्नसोहळ्याचा पहिला विधी सेरी बेगवानमध्ये सोन्याचा घुमट असलेल्या मशिदीत झाला. प्रिन्स मतीन हे जगातील दीर्घकाळ राज्य करणारे राजे असलेल्या सुल्तान हसनल बोकलिया यांचे दहावे पुत्र आहेत. त्यामुळे ब्रुनेईचे राजे बनण्याच्या क्रमवारीत ते खूप मागे आहेत.त्यामुळे ते सुल्तान बनण्याची शक्यता फारच कमी आहे.तर प्रिंस मतीन यांची होणारी पत्नी ही फॅशन आणि टुरिझम व्यवसाय चालवते. यांग मुलिया अनीषा रोस्नाचे आजोबा हे युवराज मतीन यांचे वडील म्हणजेच ब्रुनेईच्या विद्यमान सुल्तानांचे प्रमुख सल्लागार राहिले आहेत.प्रिन्स मतीन हे ब्रुनेईमधील हेलिकॉप्टर पायलट आहेत. माध्यमांमधून त्यांची तुलना ही ब्रिटनचे प्रिन्स हॅरी यांच्याशी केली जाते. सोशल मीडियावर त्यांचा जबरदस्त चाहतावर्ग आहे. ते त्यांच्या लूकमुळे प्रसिद्ध आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top