भगवे जाकीट परिधान करत पंतप्रधानांनी मतदान केले

गांधीनगर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गांधीनगर मतदारसंघांतर्गत येणाऱ्या राणीप परिसरातील अहमदाबादमधील निशान उच्च माध्यमिक विद्यालयात मतदान केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी पांढरा कुर्ता-पायजमा आणि भगवे जाकीट परिधान केले होते. यावेळी मतदान केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. मतदान करून केंद्राबाहेर आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी लोकांना अभिवादन केले. तसेच त्यांनी तेथे उपस्थित लोकांशी संवाद साधला. मोदींनी सांगितले की, आज लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा आहे. मी प्रत्येकाला मतदान करण्याचे आवाहन करतो. मी नेहमीच इथे मतदान करतो. इथे अमित शहा निवडणूक लढवत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top