भरत गोगावले यांच्या अडचणी वाढल्या! ठाकरेंनी जाहीर केला महाडमधील उमेदवार

मुंबई – आमदार अपात्रता निकालाच्या तिसऱ्या दिवशीच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाड विधानसभेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत महाड या नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांना कुठल्याही परिस्थितीत महाड मधून निवडून आणायचे आहे, भरत गोगावले यांना पराभूत करण्यासाठी जंगजंग पछाडा असे निर्देश कार्यकर्त्यांना दिले. यामुळे भरत गोगावले यांच्या अडचणी वाढल्याची चर्चा आहे.

स्नेहल जगताप या माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत. 2019 ला माणिकराव राव जगताप यांनी भरत गोगावले यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती त्यात त्यांचा 22,000 मतांनी पराभव झाला, स्थानिक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्यावेळी भरत गोगावले यांना मदत केल्याची चर्चा आहे. स्नेहल जगताप यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत काही महिन्यापूर्वी प्रवेश केला. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी महाडमधून आपल्या पक्षातर्फे स्नेहल जगताप या आगामी विधानसभेसाठी उमेदवार असणार आहेत हे जाहीर केले होते.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी दिलेल्या निकालानंतर शुक्रवारी ठाकरे यांनी महाड येथील पदाधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर ‘नवाकाळ’शी बोलताना स्नेहल जगताप म्हणाल्या की मी पूर्ण ताकदीनीशी महाड विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. महाडचा पुढचा आमदार शिवसेना ठाकरे गटाचा असेल. दिवंगत माणिकराव जगताप यांना मानणारा वर्ग, स्नेहल जगताप यांचे समर्थक आणि उद्धव ठाकरे यांनी महाड मध्ये मेळावा घेतला तेव्हा जमलेली गर्दी पाहता भरत गोगावले यांना आगामी निवडणूक सोपी नाही असे चित्र आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top