भरधाव ट्रकची गाड्यांना धडक!१६ जणांचा मृत्यू

काराकास

व्हेनेझुएला देशाच्या पूर्वेकडील राजधानी कॅराकसला जोडणार्‍या ग्रॅन मारिसकल डी अयाकुचो महामार्गावर एका भरधाव ट्रकने गाडी आणि बसला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात १६ जणांचा जागीच मृत्यू झाला. ६ जण जखमी आहेत.या अपघातानंतर संपूर्ण रस्त्यावर आगीचे लोट पसरले होते. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी जाऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या अपघातात एकूण १७ वाहनांचे नुकसान झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top