भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला धडक! ४ मजुरांचा मृत्यू

सांगली

सांगली-सोलापूर महामार्गावर आज सकाळच्या सुमारास ऊसतोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला भरधाव ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात ४ मजुरांचा मृत्यू झाला, तर १० ते १२ जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांमध्ये दोन महिला, एक मुलगा आणि लहान मुलीचा समावेश आहे. या ट्रॅक्टरमध्ये १० हून अधिक ऊसतोड कामगार आणि त्यांची मुले होती. हे सर्वजण सोलापुरातील मंगळवेढा तालुक्यातील चिकलगी भुयार येथील असल्याचे सांगितले जाते. ते ऊसतोडणीचे काम आटोपून घरी परतत होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top