भवानी मातेचे दुसरे रूप श्रीरामवरदायिनी जत्रोत्सव

रत्नागिरी – महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपिठापैकी एक असलेल्या तुळजापूरच्या भवानी मातेचे दुसरे रूप मानल्या जाणार्‍या खेड तालुक्यातील श्रीरामवरदायिनीचा जत्रोत्सव मंगळवार २३ एप्रिल रोजी होणार आहे. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला हा जत्रोत्सव साजरा केला जातो.
खेड तालुक्यातील चोरवणे गावात श्रीरामवरदायिनीचे मंदिर आहे.परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र भूमीत असलेल्या नागेश्वर देवस्थानच्या पायथ्याशी चोरवणे हे गाव आहे. गावातील देवीचे मंदिर हेमाडपंती असून हे पाषाणी कोरीव काम आणि कलाकुसरीचा एक नमुना आहे. देवीची मूर्ती कर्नाटकातून घडवून आणली आहे.या जागृत देवीची यात्रा मंगळवार २३ एप्रिल रोजी उत्साहात पार पडणार आहे.तरी या वार्षिक सोहळ्यासाठी भाविकांनी सहकुटुंब हजेरी लावावी, असे आवाहन चोरवणे ग्रामस्थ व ग्रामविकास मंडळ चोरवणे, मुंबई-पुणे यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top