भाईंदरच्या झोपडपट्टीला भीषण आग! एकाचा मृत्यू, पन्नास घरे जळून खाक

भाईंदर – भाईंदर पूर्व येथील गोल्डन नेस्ट सर्कल परिसरातील आझाद नगर झोपडपट्टीत आज सकाळी भीषण आग लागली. या आगित सुमारे पन्नास घरे जळून खाक झाली.तर एकाचा आगित होरपळून मृत्यू झाला.तर तीन जण भाजून जखमी झाले.दीपक चौरसिया असे मृत व्यक्तिचे नाव आहे.जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. सकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास झोपडपट्टीत कसला तरी स्फोट झाला आणि त्यानंतर आग भडकली असे आझाद नगरमधील रहिवाशांनी सांगितले.आझाद नगरमधील घरे ही पत्रे आणि बांबूचे स्ट्रक्चर उभे करून बांधलेल्या कच्च्या झोपडया आहेत. त्यामुळे आगिचा भडका उडाल्यानंतर झपाटयाने आग पसरली. पहाटेची वेळ असल्याने बहुतांश रहिवासी गाढ झोपेत होते. त्यामुळे आग लागल्याचे त्यांना फार उशिरा कळले. तोपर्यंत आगिने भीषण रूप धारण केले होते. आगिचे वृत्त कळताच मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आला. सुमारे दोन तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले.विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आझाद नगर झोपडपट्टीत काही व्यावसायिक गाळेदेखील आहेत. त्यापैकी अनेक गाळे आगिच्या भक्ष्य़स्थानी पडले आहेत.आगित घरे भस्मसात झाल्याने संसार उघडयावर पडले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top