Home / News / भाजपाचे बंडखोरी उमेदवार अमित घोडा नॉट रिचेबल

भाजपाचे बंडखोरी उमेदवार अमित घोडा नॉट रिचेबल

पालघर – पालघर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे बंडखोरी उमेदवार माजी आमदार अमित घोडा कालपासून नॉट रिचेबल झाले आहेत. या मतदारसंघातून भाजपाप्रणित...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

पालघर – पालघर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे बंडखोरी उमेदवार माजी आमदार अमित घोडा कालपासून नॉट रिचेबल झाले आहेत. या मतदारसंघातून भाजपाप्रणित महायुतीच्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराज झालेल्या अमित घोडा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेपूर्वीच ते कुटुंबीयांसह अज्ञातवासात गेले आहेत.

अमित घोडा हे माजी शिवसेनेचे आमदार असून २०१९ मध्येही त्यांना उमेदवारी नाकारली होती. त्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यांना डहाणू किंवा पालघरची उमेदवारी मिळेल अशी आशा होती. मात्र ऐनवेळी राजेंद्र गावित यांना महायुतीकडून उमेदवारी दिल्याने अमित घोडा नाराज झाले. उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अमित घोडा आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार का, भाजपाला त्यांची बंडखोरी रोखण्यात यश मिळणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.

Web Title:
संबंधित बातम्या