भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री व्ही श्रीनिवास प्रसाद यांचे निधन

बंगळुरू

कर्नाटक चामराजनगरचे भाजपा खासदार व्ही श्रीनिवास प्रसाद यांचे काल मध्यरात्री बंगळुरुतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले.वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते अनेक आजारांनी ग्रस्त होते. २२ एप्रिल रोजी त्यांना बंगळुरूतील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अवयव निकामी झाल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव मैसुरू येथील जयलक्ष्मीपुरम आवास येथे आणण्यात आले.

व्ही. श्रीनिवास प्रसाद यांनी १९७६ मध्ये जनता पक्षातून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. पुढे १९७९ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते काही काळ जेडीएस, जेडीयू आणि समता पक्षाचे सदस्यही होते. श्रीनिवास यांनी ९९९ ते २००४ दरम्यान माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय राज्यमंत्रिपद भूषवले. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते २०१३ मध्ये आमदार झाले आणि सिद्धरामय्या सरकारमध्ये मंत्री झाले. २०१६ मध्ये त्यांनी कर्नाटक विधानसभेचा राजीनामा दिला. त्या नतर भाजपामध्ये प्रवेश केला. २०१७ च्या पोटनिवडणुकीत, त्यांनी भाजपाच्या तिकिटावर नंजनगुडमधून निवडणूक लढवली होती. २०१९ मध्ये पक्षाने त्यांना चामराजनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगितले . तिथून ते विजयी झाले होते. त्यांनी नुकताच राजकारणात संन्यास घेत असल्याची घोषणा केली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top