भारताचा दौरा रद्द करणारे मस्क अचानक चीनमध्ये

बिंजिग
भारताचा दौरा रद्द केल्यानंतर टेस्लाचे संस्थापक इलॉन मस्क अचानक चीनमध्ये दाखल झाले. चीन जगातील इलेक्ट्रिक कारसाठी मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे मस्क यांनी भारतापेक्षा चीन दौरा महत्वाचा मानला जात, असे म्हटले जात आहे. एलॉन मस्क यांनी भारताऐवजी चीनला भेट दिल्यामुळे तर्कवितर्कही लावले जात आहेत.
एलॉन मस्क हे भारत दौऱ्यावर येणार होते. मात्र, एलॉन मस्क यांनी भारताचा नियोजित दौरा अचानक रद्द केला. भारतात गुतंवणूक करण्याच्या उद्देशाने ते भारतात येणार होते. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याकडे भारतीयांचे लक्ष लागले होते. इलॉन मस्क आज अचानक चीनमध्ये पोहोचले. त्यांच्या चीनच्या दौऱ्याची माहिती देण्यात आली नव्हती. त्यांनी हा चीन दौरा अचानक केला. या दौऱ्यात ते चीन सरकारमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटणार आहे. त्यांच्या या दौऱ्यात चीनमध्ये स्वयंचलित इलेक्ट्रिक कारच्या परवानगीबाबत महत्त्वाच्या बैठकी होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top