भारताच्या पराभवानंतर २ तरुणांची आत्महत्या

भुवनेश्वर :

क्रिकेट विश्वचषक अंतिम फेरीत भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर पश्चिम बंगालमधील बांकुरा आणि ओडिशाच्या जाजपूरमधील २ तरूणांनी जीवन संपवले. राहुल लोहार (२३) याने रविवारी रात्री ११ च्या सुमारास बांकुरा येथील बेलियाटोर पोलीस स्टेशन परिसरात एका सिनेमा हॉलजवळ टोकाचे पाऊल उचलले. भारताच्या पराभवानंतर राहुलने आपल्या खोलीत गळफास लावून घेतला, असे राहुल याचे मेहुणे उत्तम सूर यांनी सांगितले. सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी बांकुरा संमिलानी वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेची अनैसर्गिक मृत्यू अशी नोंद पोलिसांत करण्यात आली. तर ओडिशाच्या जाजपूरमध्ये रविवारी रात्री सामना संपल्यानंतर बिंझारपूर भागात देव रंजन दास (२३) या तरुणाचा मृतदेह त्याच्या घराच्या टेरेसवर लटकलेल्या अवस्थेत सापडला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top