भारतात विकल्या जाणाऱ्या नेस्लेच्या बेबी फूड मध्ये साखरेचे प्रमाण जास्त

पब्लिक आयच्या अहवालात उघड

नवी दिल्ली

बाळांचा आहार या क्षेत्रात भारतात २० हजार कोटीची वार्षिक उलाढाल असलेल्या नेस्ले इंडियाच्या बेबी फूड उत्पादनांमध्ये जास्त प्रमाणात साखर असल्याचे पब्लिक आयने केलेल्या तपासणीत उघड झाले आहे.
नेस्लेची बेबी फूड उत्पादने भारतात मोठ्या प्रमाणात विकली जातात. विशेष म्हणजे, ब्रिटन , जर्मनी, स्वित्झर्लंड , फ्रान्स आणि इतर विकसित देशांमध्ये नेस्लेची हीच उत्पादने साखरमुक्त आहेत. बाळांच्या उत्पादनांमध्ये जास्त साखर घालणे हे धोकादायक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. तरीही भारत , आफ्रिका आणि काही विकसनशील देशात उत्पादने विकताना नेस्ले साखरेचे प्रमाण वाढवते .

भारतात नेस्लेच्या १५ सेरेलॅक उत्पादनांच्या प्रत्येक सर्व्हिंगमध्ये सरासरी ३ ग्रॅम इतकी साखर असल्याचे उघकीस आले आहे. म्हणजे २५ ग्रॅम पावडरीत ८९ टक्के साखर असते तर इथिओपिया आणि थायलंड या देशांमध्ये या उत्पादनात सुमारे ६ ग्रॅम इतकी साखर आहे. या उत्पादनांच्या पॅकेजिंगवरील माहितीमध्ये साखरेचे प्रमाण स्पष्ट लिहिलेले नसते. “नेस्ले आपल्या उत्पादनांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पोषक तत्वे ठळकपणे अधोरेखित करते, मात्र त्यात साखरेचे प्रमाण जास्त असल्याचे सांगत नाही,” असे पब्लिक आयच्या अहवालात म्हटले आहे.
ब्राझीलमधील फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ पॅराबा येथील पोषण विभागातील प्राध्यापक रॉड्रिगो वियाना यांनी सांगितले की, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या अन्नामध्ये साखर घालण्याची गरज नसते. अशा उत्पादनांमुळे मुलांना गोड चवीचे व्यसन लागते. त्यांना अधिक साखरयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा होते. यामुळे त्यांच्या शरीरात रोगांचा धोका वाढतो. यात लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर गंभीर आजारांचा समावेश असतो. दरम्यान, नेस्ले इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आम्ही सर्व स्थानिक नियम आणि आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करतो. गेल्या पाच वर्षांत आम्ही लहान मुलांच्या उत्पादनातील साखर ३० टक्के कमी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top