भारताप्रमाणे पोलंडच्या संसदेत निघाला धूर! व्हिडिओ व्हायरल

वॉर्सो – भारताच्या संसदेत सुरक्षा भेदून दोन तरुणांनी धुराच्या नळकांड्या फोडल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच असाच प्रकार पोलंडच्या संसदेतही घडला.ज्यू समुदायासाठी संसदेत आयोजित हनुक्का कार्यक्रमात एका डाव्या विचारसरणीच्या एका खासदाराने कार्यक्रमाला विरोध करत जवळच असलेल्या अग्निशमन यंत्राने मेणबत्त्या विझवायला सुरुवात केली.त्यामुळे संसदेच्या संपूर्ण सभागृहात धूर पसरला आणि खासदारांना श्वास घेणेही मुश्कील झाले, त्यामुळे तोंडाला रुमाल लावून खासदारांनी संसदेबाहेर पळ काढला.

याप्रकरणी संबंधित खासदाराला शिक्षा म्हणून संसदेच्या कामकाजातून एक दिवसासाठी निलंबित केले. तसेच त्याच्या पगारातही कपात केली आहे.या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.संसदेचे अध्यक्ष सिमोन हॉलौनिया यांनी त्या खासदाराची कृती निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे.पोलंडच्या संसदेमध्ये ज्यूंचा हनुक्का हा सण साजरा होत होता. त्यासाठी तेथे मेणबत्त्या पेटविण्यात आल्या होत्या. यावेळी कॉन्फेडरेशन पार्टीचे सदस्य ग्रेगॉर्ज ब्रॉन यांनी या सणाला सैतानी म्हणत संसदेतील सर्व मेणबत्त्या विझवल्या. त्यामुळे संसदेत धुराचे लोट पसरले. अचानक धुराचे लोट पसरल्याने संसदेत गोंधळ उडाला. दरम्यान, सोमवारीच डोनाल्ड टस्क यांची पंतप्रधानपदी वर्णी लागली आहे.त्यांच्या विश्वासदर्शक ठरावावर संसदेत चर्चा होणार होती. परंतु, सदस्य ग्रेगॉर्ज ब्रॉन यांच्या या कृतीमुळे हा ठराव संसदेत येऊ शकला नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top