भारताबाहेरील आंबेडकरांच्या सर्वांत उंच पुतळ्याचे अनावरण

  • १४ ऑक्टोबर रोजी
    अमेरिकेत भव्य सोहळा

वॉशिंग्टन- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारताबाहेरील सर्वात उंच पुतळा उत्तर अमेरिकेत उभारण्यात आला असून येत्या शनिवार १४ ऑक्टोबर रोजी या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या १९ फूट उंचीच्या पुतळ्याला ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी असे नाव देण्यात आले आहे.उत्तर अमेरिकेतील मेरीलँड या राज्यातील अकोकीक शहरात १३ एकरवर एआयसी म्हणजेच आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र उभारण्यात येत आहे. या केंद्रामध्येच बाबासाहेबांचा हा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे.अकोकीक हे शहर वॉशिंग्टनपासून ३५ कि.मी.अंतरावर वर आहे.

गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ म्हणून ओळखला जाणारा पुतळा साकारणारे प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी हा अमेरिकेतील पुतळा बनविला आहे.मेरीलँडमधील ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी ‘ हैदराबादमधील १२५ फुट उंच असलेल्या जगातील सर्वांत मोठ्या आंबेडकरांच्या पुतळ्याची प्रतिकृती आहे. अमेरिकेतील हे स्मारक डॉ.आंबेडकरांचा संदेश जगभरात पसरवून समानता व मानवाधिकाराचे उत्तम उदाहरण बनेल.तसेच आंबेडकरी चळवळीचे अनुयायी तसेच विविध देशांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने १४ ऑक्टोबर रोजी या अनावरण समारंभास उपस्थित राहतील,असा विश्वास एआयसीने व्यक्त केला आहे.ज्यादिवशी महामानव डॉ.आंबेडकरांनी आणि त्यांच्या लाखो अनुयायांनी बौद्ध धर्म स्विकारला होता,त्याच दिवसाचे औचित साधून हा सोहळा पार पडणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top