Home / News / भारतीय वंशाच्या महिला डॉक्टरचा न्यूयॉर्कमध्ये विमान अपघातात मृत्यू

भारतीय वंशाच्या महिला डॉक्टरचा न्यूयॉर्कमध्ये विमान अपघातात मृत्यू

न्यूयॉर्क – भारतीय वंशाच्या महिला डॉक्टर जॉय सैनी यांचा न्यूयॉर्कमध्ये पती आणि दोन मुलांसह विमान अपघातात मृत्यू झाला.जॉय सैनी या...

By: E-Paper Navakal


न्यूयॉर्क – भारतीय वंशाच्या महिला डॉक्टर जॉय सैनी यांचा न्यूयॉर्कमध्ये पती आणि दोन मुलांसह विमान अपघातात मृत्यू झाला.
जॉय सैनी या अमेरिकेतील ख्यातनाम स्त्रीरोगतज्ज्ञ होत्या. त्यांचे पती डॉ. मिशेल ग्रॉफ (मेंदुविकारतज्ज्ञ) , फुटबॉलपटू मुलगी करिना ग्रॉफ आणि मुलगा जॅरेड ग्रॉफ हे खासगी विमानाने वाढदिवस साजरा करण्यासाठी कास्टकील माऊंटन्स येथे जात असताना इंजिनमध्ये बिघाड होऊन विमान कोसळले. या अपघातात पती-पत्नी आणि दोन्ही मुले जागीच ठार झाले.
न्यूयॉर्कच्या व्हाईट प्लेन्समधील वेस्टचेस्टर काउंटी विमानतळावरून ग्रॉफ यांच्या खासगी विमानाने उड्डाण केले होते. न्यूयॉर्कजवळील कॅरिव्हिले येथे त्यांचे विमान कोसळले. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

Web Title:
संबंधित बातम्या