भारतीय वंशाच्या समीर शहांची बीबीसीच्या अध्यक्षपदी निवड

लंडन- टीव्ही पत्रकार म्हणून गेली ४० वर्षे कार्यरत असलेले मूळ भारतीय वंशाचे समीर शहा यांची ब्रिटन सरकारने बीबीसीच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे.समीर शहा हे रिचर्ड शार्प यांचा कार्यभार सांभाळतील. ब्रिटिश संसदी समितीडून त्यांच्या नियुक्तीला अनुमोदन देण्यात आले आहे.

७१ वर्षीय समीर शहा यांचा जन्म १९५२ मध्ये महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला असून १९६० मध्ये ते इंग्लंडला आले.अमृत शहा आणि उमा बकाया असे त्यांच्या आई-वडिलांचे नाव आहे. त्यांनी यापूर्वी बीबीसीमध्ये चालू घडामोडी आणि राजकीय कार्यक्रमांचे प्रमुख म्हणून काम केले. बीबीसीचे अध्यक्ष रिचर्ड शार्प यांना एप्रिल २०२३ मध्ये या पदावरून हटवण्यात आले होते.विशेष म्हणजे, सध्या बीबीसी आर्थिक संकटातून जात असताना सरकारने बीबीसीची सुत्रे समीर शाह यांच्याकडे सोपवली आहेत.बीबीसीने काही दिवसांपूर्वीच आपल्या न्यूजनाईट कार्यक्रमाचे प्रसारण बंद करणार असल्याची घोषणा केली आहे.आता सरकारने बीबीसीच्या लायसन्स शुल्कात वाढ करण्याची जबाबदारी समीर शाह यांच्यावर सोपवली आहे, जो बीबीसीचा मुख्य आर्थिक स्त्रोत आहे.

पंतप्रधान ऋषी सुनक यांनी काही दिवसांपूर्वीच वार्षिक शुल्कात ९ टक्के वाढ थांबवण्याची योजनाआखली असल्याचे वृत्त युके मीडियाने दिले होते. सध्या हे शुल्क प्रतिकुटुंब २०० डॉलर्स एवढे आहे.आता परवाना शुल्काबाबत सरकारशी वाटाघाटी करण्याची जबाबदारीही शहा यांच्यावर सोपविण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top