भारती पवार-नितीन पवार भेट दीर-भावजयीमध्ये तूर्त समेट

नाशिक

नाशिकच्या भाजपा खासदार तथा दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार भारती पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार यांची आज भेट घेतली. भारती पवार आणि नितीन पवार हे सख्खे दीर-भावजय असून त्यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. परंतु लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भारती पवार नितीन पवार यांच्या भेटीला गेल्याने तूर्तास त्यांच्या समेट झाल्याची चर्चा सर्वत्र आहे.

नितीन पवार आणि भारती पवार यांच्यातील वैर संपुष्टात आल्यास राजकीय संघर्ष बदलणार आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात या वादाचे सकारात्मक परिणाम भारती पवार यांच्या बाजूने होणार आहे. त्यामुळे २० मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत भारती पवार यांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. भारती पवार नितीन पवार यांच्या घरी गेल्यानंतर “आमच्यात मतभेद होते. मनभेद नाही,” असे त्यांनी म्हटले. यावेळी त्या भावुक झाल्या होत्या. तर यावेळी नितीन पवार म्हणाले की, “आमचे राजकीय मतभेद होते. पण कुटुंब म्हणून आम्ही एकत्रच होतो.”

दरम्यान, दिंडोरी लोकसभा मतदार संघात महायुतीकडून भारती पवार तर मविआकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या ठिकाणी माकपचे माजी आमदार जे. पी. गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी अर्ज मागे घेत मविआला पाठिंबा दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top