भावना गवळी यांच्या माजी स्वीय सहाय्यकाला आयकरची नोटीस

वाशिम- शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांचे माजी स्वीय सहाय्यक अशोक गांडुळे यांच्या भावना अॅग्रोटेक कंपनीला आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे भावना गवळींच्या अडणचीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भावना गवळी म्हणाल्या की, या कंपनीशी माझा कोणताही संबंध नाही. मी त्या कंपनीत संचालक किंवा कोणत्याही पदावर राहिलेली नाही.
आयकर विभागाने गांडुळे यांच्याशी संबंधीत काही व्यक्ती आणि सीए अशोक मुळे यांनादेखील आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. दरम्यान, भावना गवळी यांच्यावर याआधी ईडीने कारवाई केली होती. त्यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली होती. गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचे बँक खातेदेखील आयकर विभागाने गोठवले होते. मात्र, गवळी यांनी हे वृत्त फेटाळले आहे. ८ कोटी १६ लाखांचा आयकर थकवल्याप्रकरणी आयकर विभागाने ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. कर चुकवेगिरीप्रकरणी आयकर विभागाने महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या विश्वस्त आणि संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना गवळी यांच्या संस्थांना नोटीस बजावल्या जात असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा वाढल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top