भावी मुख्यमंत्र्यांची भेट भोवली पोलीस महासंचालक निलंबित

हैद्राबाद :

तेलंगणा राज्याचे पोलीस महासंचालक अंजनीकुमार यांना निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने निलंबित केले आहे. काल अंजनीकुमार यांनी मतमोजणीवेळी काँग्रेसची विजयी घोडदौड सुरू झाल्यानंतर त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ए. रेवंथ रेड्डी यांची भेट घेऊन अभिनंदन केले. यात निवडणूक आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने अंजनीकुमार यांना निलंबित केले होते.

ए. रेवंथ यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी अंजनीकुमार यांच्या समवेत गेलेल्या संजयकुमार जैन, महेश भागवत या २ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही निवडणूक आयोगाने निलंबित केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी ही कठोर कारवाई केली. तेलंगणातील विधानसभा निवडणूक रिंगणात असलेल्या २२९० उमेदवारांपैकी केवळ एका विशिष्ट उमेदवाराला पोलिस महासंचालक भेटले. हा उमेदवार एका राजकीय पक्षाचा स्टार प्रचारकही आहे. अशा व्यक्तीची मेहेरनजर होण्यासाठी पोलीस महासंचालकांनी ही भेट घेतली असावी, अशी चर्चा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top