भिवंडीतील तीन गोदामांना आग

भिवंडी –
भिवंडी तालुक्यातील राहणाळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गोविंद कंपाऊंड येथील तीन गोदामांना आज दुपारी भीषण आग लागली. केमिकल साठवून ठेवलेल्या २ गोदामांसह चपलेचे एक गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आज दुपारी गोविंद कंपाऊंडमधील एका गोदामात ठेवण्यात आलेल्या केमिकलला अचानकपणे आग लागली. या आगीत शेजारच्या गोदामामध्ये साठवून ठेवलेल्या केमिकललाही आग लागली आणि त्यानंतर काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. अग्निशमक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आग विझवली. या दुर्घटनेत आतापर्यत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top