Home / News / भिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग

भिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग

भिवंडी-भिवंडी शहरच्या नागाव परिसरातील फातमा नगर येथील भंगाराच्या गोदामाला आज सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात गोदामातील भंगारासह...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

भिवंडी-भिवंडी शहरच्या नागाव परिसरातील फातमा नगर येथील भंगाराच्या गोदामाला आज सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात गोदामातील भंगारासह आजूबाजूची घरेही जळून खाक झाली. मात्र, या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.नागाव येथील अनमोल हॉटेलच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात भंगार साठवलेल्या गोदामाला सायंकाळी ४ वाजता आग लागताच काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. लोकांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले. मात्र आग पसरत गेल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे अवघड बनले. या गोदामाच्या जवळील अनेक घरे या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल ३ तासांनी आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले.

Web Title:
संबंधित बातम्या