भुजबळांच्या वाढदिवसाचा बॅनर अज्ञातांनी फाडला

नाशिक- अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांना धमकीचे फोन येत असतानाच आज त्यांच्याच येवला मतदारसंघात त्यांच्या वाढदिवसाचा बॅनर अज्ञातांनी फाडल्याची घडली. तसेच बॅनरवर शाईफेक देखील करण्यात आली.
छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या येवला मतदार संघात नाशिक राज्य महामार्गावर अंगणगावजवळ ही बॅनर फाडण्याची घटना घडली. छगन भुजबळ यांचा आज वाढदिवस होता.यानिमित्त हा शुभेच्छा बॅनर लावण्यात आला होता.दरम्यान,मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये समावेश करावा,या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र दौरा करत आहेत. त्यांच्या या मागणीला भुजबळांनी विरोध केल्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. भुजबळांना जीवे मारण्याची धमकी आल्याचे प्रकरण ताजे असताना आता कोणा अज्ञातांनी त्यांचा बॅनर फाडल्याने पुन्हा हा वाद चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top