भुवनेश्वर-हावडा जनशताब्दी एक्स्प्रेसच्या डब्याला आग

कटक – ओडिशातील कटक रेल्वे स्थानकावर भुवनेश्वर-हावडा जनशताब्दी एक्स्प्रेस ट्रेनच्या डब्याला आग लागल्याची घटना आज गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता घडली.अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली.यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.हावडा-जनशताब्दी एक्स्प्रेसने कटक रेल्वे स्थानकावर थांबण्यासाठी ब्रेक लावताच डब्याच्या चाकांमधून धूर येऊ लागला. त्यानंतर अचानक आगीच्या ज्वाला वाढू लागल्या. त्यामुळे लगेच कटक रेल्वे स्थानकाचे अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान विलंब न लावता घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी काही वेळातच आग आटोक्यात आणली.आग विझविल्यानंतर ट्रेनची सुरक्षा तपासणी केली आणि मग ही गाडी पुढे रवाना झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top