भूकंपामुळे बांगलादेश हादरला! लडाखपर्यंत जाणवले धक्के

ढाका – बांगलादेशात आज सकाळी ९:०५ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ५.६ इतकी नोंदवण्यात आली. भूकंप ५५ किमी (६.२ मैल) खोलीवर होता. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की, ते भारतातील लडाखपर्यंत जाणवले. मात्र, भूकंपामुळे जीवित वा वित्तहानी झाल्याची माहिती नाही. बांगलादेशच्या भूकंपाचे धक्के पश्चिम बंगालच्या विविध भागातही जाणवले. पश्चिम बंगाल आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले की, ‘ राज्यात कुठेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.’ कोलकाता पोलीस आणि कोलकाता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनीही सांगितले की, पूर्व महानगरातून कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, लडाख केंद्रशासित प्रदेशात आज सकाळी ३.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भागातही कोणतेही नुकसान झालेले नाही. भूकंपाचे केंद्र ३३. ४४ अंश अक्षांश आणि ७७.३६ अंश रेखांशावर पृष्ठभागापासून १० किलोमीटर खाली होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top