भोगावती साखर कारखाना निवडणुकीत नात्यातच लढत

कोल्हापूर :

भोगावती सहकारी साखर कारखान्याचे राजकारण नेहमी नात्यागोत्यातच फिरत असते. यंदाची निवडणूकही त्याला अपवाद नाही. कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष उदय पाटील-कौलवकर हे सत्ताधारी आघाडीच्या पॅनलचे प्रमुख असून त्यांच्याविरोधात कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी विरोधी पॅनलकडून दंड थोपटले आहेत.

उदय पाटील हे धैर्यशील पाटील यांचे चुलते आहेत. तर के. पी. पाटील यांचे जावई आहेत. त्यांच्याविरोधात सत्तारुढ आघाडीकडून के. पी. पाटील यांचे मेहुणे ए. वाय. पाटील नेतृत्व करत आहेत. गेली पाच वर्षे धैर्यशील पाटील कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या विरोधात पी. एन. पाटील यांनी मोट बांधून कारखान्यात सत्तांतर घडवून आणले. पी. एन. पाटील सध्या पॅनेलबाहेर राहून सत्तारुढ आघाडीचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्यासोबत उदय पाटील – कौलवकर, ए. वाय. पाटील हेही आहेत. ३४ वर्षांचा पी. एन. पाटील आणि संपतराव पवार-पाटील गटाचा संघर्ष थांबवून संपतरावांचे चिरंजीव क्रांतिसिंह सत्तारुढ आघाडीसोबत आहेत. ते निवडणूक लढवत नसले तरी त्यांचे चुलतभाऊ अक्षय अशोकराव पाटील सत्तारुढ आघाडीच्या पॅनलमध्ये आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top