भोजपुरी अभिनेत्री अमृता पांडेची गळफास घेऊन आत्महत्या

भागलपूर
भोजपुरी अभिनेत्री अमृता पांडे हिने आपल्या राहात्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. भागलपूरमधील आदमपूर परिसरात तिच्या घरी ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिला स्थानिक रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषत केले. तिच्या निधनाने भोजपुरी करमणूक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या झाली का या दिशेने पोलिस तपास करत आहेत. मृत्यू पूर्वी तिने टाकलेल्या व्हॉट्स अप स्टेटस मध्ये तिने लिहिले होते की, ‘दोन बोटींवर त्यांचे आयुष्य अवलंबून का होते. आम्ही एक बोट बुडवून त्याचं आयुष्य सोप्प केलं.’ अी नेक दिवस काम न मिळाल्याने ती निराशेत होती. तिच्या प्रतिशोध या मालिकेचा एक भागही प्रकाशित झाला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top