मुंबई – शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांना अचानक उच्च रक्त दाबाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना तात्काळ मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या उदय सामंत यांची प्रकृती स्थिर असून ते लवकरच बरे होतील असे डॅाक्टरांनी सांगितले आहे.