मडुरा देवी माऊलीचा रविवारी वर्धापन दिन

सावंतवाडी- तालुक्यातील मडुरा ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वर्धापन दिन सोहळा रविवार ५ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
रविवारी सकाळी श्रींची पूजाअर्चा, त्यानंतर श्रींची महापूजा, दुपारी महाआरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होईल. सायंकाळी महिलांची फुगडी, त्यानंतर स्थानिकांचे भजन, रात्री १० वाजता मडुरा-परबवाडीच्या आदर्श तरुण हौशी नाट्यमंडळाचे ”संगीत रुक्मिणी स्वयंवर” हे नाटक होईल. यात प्रवीण परब, भूषण परब, दिनेश परब, अरविंद परब, केशव परब, प्रशांत परब, सुभाष परब, बुधाजी परब, अभय परब, अविनाश परब, शारदा शेटकर, लक्ष्मी महात्मे, प्राची परब यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तरी भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान उपसमितीमार्फत केले आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top