मणिपुरात कुकी अतिरेक्यांच्या गोळीबारात पोलिसाचा मृत्यू

इंफाळ – मणिपूरमध्ये हिसांचाराच्या घटना सुरू असताना मणिपूरच्या तेंगनौपाल जिल्ह्यातील मोरेह भागात कुकी अतिरेक्यांनी एसडीओपीपदावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या केली. आनंद कुमार असे मृत पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. ते कुकी-जो समाजाचा प्रभाव असलेल्या भागात कार्यरत होते.

आनंद कुमार हे हेलिपॅडसाठी जमीन साफ करण्याच्या कामावर देखरेख करण्यासाठी बॉर्डर टाउनमधील एका शाळेत गेले होते. राज्य दल आणि बीएसएफचे जवानही त्यांच्यासोबत होते. कुकी अतिरेक्यांनी आनंद कुमार यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्यांना एसडीओपींना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. राज्य सरकारने आनंद यांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत घोषित केली. मोरेह आणि आजूबाजूच्या परिसरात अतिरेक्यांना पकडण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे.

मोरेह येथील काही नागरी संस्था अनेक आठवड्यांपासून सीमावर्ती भागातून सुरक्षा दलांना हटवण्याची मागणी करत होते. यानंतर अशी घटना घडली आहे. शुक्रवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करणाऱ्या संयुक्त विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top