Home / News / मणिपूरमध्ये पुन्हा ‘लष्कर राज’ ‘अफ्स्पा’ कायदा पुन्हा लागू

मणिपूरमध्ये पुन्हा ‘लष्कर राज’ ‘अफ्स्पा’ कायदा पुन्हा लागू

इम्फाळ – गेले सुमारे वर्ष दीड वर्षे जातीय हिंसाचाराच्या वणव्यात होरपळत असलेल्या मणिपूरमध्ये लष्कराला विशेषाधिकार देणारा वादग्रस्त अफ्स्पा कायदा पुन्हा...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

इम्फाळ – गेले सुमारे वर्ष दीड वर्षे जातीय हिंसाचाराच्या वणव्यात होरपळत असलेल्या मणिपूरमध्ये लष्कराला विशेषाधिकार देणारा वादग्रस्त अफ्स्पा कायदा पुन्हा लागू करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंबंधीची अधीसूचना जारी केली आहे. त्यानुसार राज्यातील सहा पोलीस ठाण्यांची हद्द अशांत टापू घोषित करण्यात आला असून या ठिकाणी अफ्स्पा कायदा पुन्हा लागू करण्यात आला आहे.
सेकमई, लामसंग, लामाई, जिरीबाम, लेईमाखोंग आणि मोईरंग या सहा पोलीस ठाण्याच्या हद्दींमध्ये १ ऑक्टोपासून पूर्वलक्षी प्रभावाने अफ्स्पा कायदा लागू झाला आहे.
या सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बंडखोरांचा उपद्रव वाढल्याने सुरक्षा दलांना परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे कठीण होऊन बसले आहे.त्यामुळे या सहा ठिकाणांवर अफ्स्पा पुन्हा लागू करावा लागत आहे,असे स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या