मतदान जनजागृतीसाठी कोरेगावात सेल्फी पॉईंट

कोरेगाव- सातारा लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी निवडणूक आयोग आणि प्रशासन सज्ज झाले आहे. कोरेगाव शहरात तर प्रशासनाने ‘हातभर तक्रारींचा बोटभर उपाय असून मतदान १०० टक्के करा ‘ असे संदेश देणारे आकर्षक सेल्फी पॉईंट ठिकठिकाणी लावले आहेत. सध्या अनेक नागरिक हौस म्हणून याठिकाणी सेल्फी काढताना दिसत आहेत.
कोरेगाव प्रशासनाने मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.त्याचाच एक भाग म्हणून आधुनिक काळातील आकर्षण असणारे ‘सेल्फी स्टँड ‘ शहरात पाच ते सहा ठिकाणी उभारले आहेत. त्यामध्ये नगरपालिका कार्यालय,बांधकाम विभाग, एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन, पंचायत समिती आणि तहसील कार्यालय आदी ठिकाणांचा समावेश आहे. या ‘सेल्फी स्टँड’वर असा संदेश लिहिला आहे की, हातभर तक्रारींचा बोटभर उपाय असून मतदान शंभर टक्के करा.आपल्या समस्या दूर करणे आणि विकास साधून, समृद्धीचे मार्ग खुले करणे यासाठी मतदान हा अत्यंत प्रभावी मार्ग आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top