मतदान होताच हसन मुश्रीफ इटली-स्पेनच्या सहलीवर

-जनतेची परवानगी मागून सुट्टीवर
कोल्हापूर – कोल्हापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी गेला महिनाभर पायाला भिंगरी लावून फिरलेले वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि कोल्हापुरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ मतदान होताच चौदा दिवसांच्या सुट्टीवर इटली आणि स्पेनला सहलीवर जात आहेत. यासाठी मुश्रीफ यांनी चक्क जनतेकडेच सुट्टी देण्याची विनंती जाहीरपणे केली होती. जनतेने परवानगी देताच मुश्रीफ यांनी आपल्या घराच्या बाहेर मोठा फलक लावून सुट्टी मंजूर केल्याबद्दल जनतेचे आभार मानले आहेत.

४ जून रोजीच्या मतमोजणीसाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील याबद्दल शंका नाही. पुढील महिनाभर आचार संहिता लागू राहणार असल्याने विकासाची कामे होणार नाहीत. म्हणून केडीसीसी बँकेच्या सर्व संचालकांनी स्वखर्चाने इटली आणि स्पेनची सहल काढायचे ठरविले आहे.१० ते २४ मे या कालावधीत माझा मोबाईल सुरूच राहील. मात्र तिथली वेळ भारतीय वेळेच्या साडेतीन तास पुढे आहे.त्यामुळे अगदी गरज असेल तरच फोन करा. मला १४ दिवसांची सुट्टी मंजूर केल्याबद्दल मी तुमचा मनःपूर्वक आभारी आहे,असे मुश्रीफ यांनी या फलकावर लिहिले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top