Home / News / मध्यप्रदेश ते गोवा विशेष ट्रेन कल्याण,पनवेलमार्गे धावणार

मध्यप्रदेश ते गोवा विशेष ट्रेन कल्याण,पनवेलमार्गे धावणार

भोपाळ- पश्चिम मध्य रेल्वेने मध्य प्रदेशातील रीवा ते गोव्यातील मडगाव स्थानकादरम्यान विशेष साप्ताहिक ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच जबलपूरहून...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

भोपाळ- पश्चिम मध्य रेल्वेने मध्य प्रदेशातील रीवा ते गोव्यातील मडगाव स्थानकादरम्यान विशेष साप्ताहिक ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच जबलपूरहून तीन विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. रीवा-मडगाव-रीवा दरम्यान धावणारी साप्ताहिक विशेष ट्रेन प्रत्येकी दोन फेऱ्या करेल,अशी माहिती भोपाळ रेल्वे विभागाच्या प्रवक्त्याने दिली.

या रेल्वे प्रवक्त्याने सांगितले की, ट्रेन क्रमांक ०१७०३ रीवा-मडगाव विशेष ट्रेन २२ डिसेंबर आणि २९ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता रीवा येथून सुटेल आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी रात्री ९.२५ वाजता मडगाव स्थानकात पोहोचेल.तर ट्रेन क्रमांक ०१७०४ मडगाव-रीवा विशेष गाडी मडगावहून २३ डिसेंबर आणि ३० डिसेंबर रोजी रात्री १०.२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी हरदा, इटारसी येथून तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी ८.२० वाजता रीवा स्थानकावर पोहोचेल.या ट्रेन सतना, मैहर,कटनी, जबलपूर, नरसिंगपूर,पिपरिया, इटारसी, हरदा, खांडवा, भुसावळ,जळगाव, मनमाड, नाशिक रोड,कल्याण जंक्शन,पनवेल,रोहा, चिपळूण,रत्नागिरी, कणकवली,कुडाळ, सावंतवाडी,थिवी आणि करमाळी स्थानकांवर थांबतील.

Web Title:
संबंधित बातम्या